सीनेसृष्टीशी भेटीत पंतप्रधानांचे दक्षिणेकडे दूर्लक्ष

हैदराबाद : सीनेसष्टी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत दक्षिणेकडील कोणत्याही दिग्गज अभिनेत्याला निमंत्रित केले नाही याचे मला खुप दु:ख होते आहे, असे ट्‌विट टॉलीवूड हिरो राम चरण यांची पत्नी, मेगास्टार चिरंजिवी यांची सून उपासनी कोनिडेला यांनी केले. त्याला लाईक करत पंतप्रधान मोदी यांनी त्याची दखल घेतल्याचे दाखवून दिले.

अपोलो साखळी रुग्णालयाचे संस्थापक प्रताप रेड्डी यांची नात आणि चिरंजिवी कुटुंबातील तरूण व्यावसायिक असणाऱ्या उपासणा सोसल मिडियावर सक्रिय असतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही खूप मोठी आहे. “प्रिय नरेंद्र मोदीजी, आम्ही दक्षिण भारतीय तुमचा सन्मान करतो. तुम्ही आमचे पंतप्रधान आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो. पूर्ण आदर ठेवूनही मला वटते, की आघाडीच्या व्यक्ती आणि सांस्कृतिक दिग्गज यांच्यात केवळ हिंदी भाषकांचाच वरचष्मा होता. दक्षिण चित्रपटसृष्टी पूर्णत: दुर्लक्षित होती. अत्यंत कष्टी मनाने मी माझी भावना मांडत आहे. आशा आहे, तुम्ही याचा योग्य पध्दतीने विचार कराल.’ असे ट्‌विट त्यांनी केले.

या ट्‌विटमध्ये त्यांनी आपले सासरे चिरंजिवी यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. पंतप्रधांनांनी शनिवारी पोस्ट केलेल्या छायाचित्रात शाहरूख खान, अमीर खान, कंगना राणावत, जॅकलीन फर्नांडिस, इम्तीयाझ अली, एकता कपूर, अनुराग बसू आणि बोनी कपूर यांच्या समवेतची छायाचित्रे प्रकाशित केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.