दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय कर्नाटक दौर्याच्या आहे. या कर्नाटक दौर्याच्या पार्श्वभूमीवर काढलं सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. 2 आणि 3 जानेवारी दरम्यान मोदी कर्नाटकचा दौरा करणार आहेत.
विशेष सुरक्षा दलाच्या (एसपीजी) अधिकाऱ्यांनी कर्नाटक पोलिसांसोबत बैठक घेतली. तुमकुरू जिल्ह्याचे उपायुक्त डॉ. राकेश कुमार यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार,पंतप्रधान तुम्मकुरूत असताना कोणत्याही ड्रोनला परवानगी दिली जाणार नाही. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
पंतप्रधान 2 जानेवारीला बंगळूरला पोहोचतील आणि हेलिकॉप्टरने श्री सिद्धगंगा मठाच्या दर्शनासाठी तुमकुरुला प्रस्थान करतील. सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्यानंतर मोदी कनिष्ठ महाविद्यालय मैदानावर आयोजित कृषी कर्मण पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहतील.
सायंकाळी पंतप्रधान संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला भेट देण्यासाठी बंगळुरुला परततील. त्यांचा मुक्काम राजभवनात असेल. दुसर्या दिवशी पंतप्रधान बंगळुरु येथील कृषी विज्ञान विद्यापीठातील गांधी कृषी विज्ञान केंद्र परिसरातील 107 व्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसचे उद्घाटन करतील.
यानंतर मोदी दुपारी नवी दिल्लीला प्रस्थान करतील. मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा मंगळवारी तुमकुरू येथे संबंधित सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.