नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठकीपूर्वी सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांच्या बरोबरच दोन माजी पंतप्रधानांसोबत कोरोना विषाणूसंदर्भात चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भातल्या सुरु असलेल्या कारवाईबद्दल माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि माजी पंतप्रधान मनमोहन शिंग यांच्याशी फोनवर चर्चा केली.
त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतही चर्चा केली. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, बीजेडीचे नवीन पटनाईक, अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल यांच्याशिवाय दक्षिण भारताील मोठे नेते के चंद्रशेखर राव, एमके स्टॅलिन यांच्याशी पंतप्रधान मोदींनी संवाद साधला.