‘पीएम नरेंद्र मोदी’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख अखेर निश्‍चित झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर २४ मे रोजी पीएम नरेंद्र मोदी चित्रपट देशभरात प्रदर्शित करण्यात येईल, अशी घोषणा निर्मात्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका विवेक ओबरॉय निभावत असून ओमंग कुमार यांची चित्रपट दिग्दर्शन केले आहे.

याआधी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक होईपर्यंत हा सिनेमा प्रदर्शित न करण्याचं सांगितलं होत. कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्याच्या जीवनावरील सिनेमा निवडणुकीदरम्यान प्रदर्शित करता येत नाही.

दरम्यान, ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट हा ३८ देशात प्रदर्शित केला जाणार आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटेन, कॅनाडा, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.