‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिकच्या प्रदर्शनाची बदलली तारीख   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु, आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाला असून हा चित्रपट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. यासंदर्भातील माहिती ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करून दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून ११ एप्रिलपासून देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. यानंतर चित्रपट १२ एप्रिल रोजी प्रदर्शित होईल, असे जाहीर करण्यात आले. मात्र यावर गोव्यातील काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाला पत्र लिहून त्यांनी निवडणुकांच्या काळात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालावी अशी मागणी पत्र लिहून केली होती. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या बायोपिकच्या दिग्दर्शनाची धुरा ओमंग कुमार बी. यांनी सांभाळली असून विवेक ओबरॉय आणि संदीप सिंग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर विवेक ओबरॉय नरेंद्र मोदींच्या भूमिकेत झळकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.