#CWC2019 : भारतीय संघाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

नवी दिल्ली : पावसाच्या व्यत्ययामुळे आरक्षित दिवशी खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या रोमहर्षक उपांत्य सामन्यामध्ये आज भारताचा 18 धावांनी पराभव झाला. विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर बलाढ्य संघांना पराभूत केलेल्या भारतीय संघाला आज न्यूझीलंडने उभारलेल्या 240 धावांचे किरकोळ आव्हान पार करण्यात अपयश आलं आहे.

भारताच्या या पराभवामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे भारतीय चाहत्यांची मोठी निराशा झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील याला अपवाद ठरले नाहीत.

या सामन्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले आहे की, “या सामन्याचा निकाल निराशाजनक आहे. मात्र, भारताने शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून खूप चांगले वाटले. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम होते. याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव हा आयुष्याचा एक भाग असतो. भारतीय संघाला भविष्यासाठी शुभेच्छा”

दरम्यान, न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली. या पराभवामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.