“पीएम नरेंद्र मोदी’ 11 एप्रिलला होणार रिलीज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकच्या रिलीजची तारीख निश्‍चित झाली आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजला बऱ्याच राजकीय पक्षांकडून विरोध व्हायला लागला होता. सुप्रीम कोर्टमध्ये यासाठी याचिकाही दाखल झाल्या होत्या. तर या प्रकरणी कोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. त्यामुळे निर्मात्यांनी रिलीज बेमुदत पुढे ढकलायचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, आज सुप्रीम कोर्टने याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टच्या मते जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये कुठल्याही पक्षाच्या प्रचार होत असेल तर त्याबाबत तपास निवडणूक आयोग करेल. निवडणूक आयोगाने हे निश्चित केले पाहिजे की, आदर्श आचार संहितेचा या चित्रपटामुळे उल्लंघन होत आहे किंवा नाही. आता सर्व अडचणींवर मात केल्यावर “पीएम नरेंद्र मोदी’ 11 एप्रिलला रिलीज करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.