पाकिस्तानातील निदर्शनांत झळकले मोदींचे पोस्टर

सिंध – पाकिस्तानातील सिंधी समुदायाची निदर्शने आणि अस्वस्थता वाढत चालली असून अनेक वर्षांपासून वेगळ्या देशाची मागणी करणाऱ्या या समुदायाने आणि पाकिस्तानला विरोध करताना पाकच्या शेजारी देशांकडून आता जाहीरपणे मदतीची याचना सुरू केली आहे.

आधुनिक सिंधी राष्ट्रवादाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या जी. एम सैय्यद यांच्या 117 व्या पुण्यतिथिनिमित्त येथे निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी करणाऱ्या घोषणा करण्यात आल्या.

यावेळी निदर्शकांच्या अन्य देशांच्या नेत्यांचे व विशेषत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर होते. सिंध प्रांत हा सिंधु संस्कृतीच्या सभ्यतेचे आणि वैदिक धर्माचे घर आहे. ब्रिटिशांनी त्यावर अवैधपणे कब्जा केला होता.

1947 मध्ये जेव्हा ब्रिटीश साम्राज्याचा अस्त झाला व भारताची फाळणी झाली तेव्हा हा भूभाग बेकायदेशीरपणे इस्लामी राजवटीच्या हाती सोपवण्यात आला. हे आम्हाला अमान्य आहे. आमची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे व आम्हाला आमचे वेगळे राष्ट्र हवे आहे. त्याकरता अन्य देशांच्या नेत्यांनी मदत करावी अशी मागणी निदर्शनांत सहभागी झालेल्या लोकांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.