मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वे ट्रेनचे उद्घाटन केले. नरेंद्र मोदींनी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर ते मरोळ येथील कार्यक्रमाला गेले. बोहरा मुस्लिम समाजाने मरोळमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, या कार्यक्रमात नरेंद्र मोदींनी भावनिक भाषण केले. विशेष बाब म्हणजे आज मरोळ येथील अल्जामिया-तुस-साफिया संकुलाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मी तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहे, असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
“मी तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. मी इथे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री नाही. माझ्याकडे जे आहे ते फार कमी लोकांकडे आहे. मी या कुटुंबातील चार पिढ्यांचा आहे. मी खूप भाग्यवान आहे,” असे भावनिक वक्तव्य पंतप्रधान मोदींनी यावेळी केले.
‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जेव्हा जेव्हा मी तुमचे व्हिडिओ आणि चित्रपट पाहिले, त्यावर माझी एकच तक्रार आहे. तुम्ही मला त्यात “आदरणीय पंतप्रधान” म्हटलं. पण मी तुमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. मी इथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री म्हणून आलेलो नाही. मी भाग्यवान आहे की मी ४ पिढ्यांपासून या कुटुंबाशी जोडलेला आहे. चारही पिढ्यांनी माझ्या घरी भेट दिली आहे. ‘असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“तुमचे प्रेम मला पुन्हा पुन्हा तुझ्याकडे आणते. काही यशांची स्वप्ने पाहण्यासाठी अनेक दशके लागतात. अल जामिया सैफियाची मुंबई शाखा म्हणून कल्पना अनेक दशकांपूर्वीची आहे. त्यावेळी देश गुलामगिरीत होता. शिक्षण क्षेत्रात एवढं मोठं स्वप्न पाहणं ही मोठी गोष्ट होती. पण चांगल्या विचारांनी पाहिलेली स्वप्ने यशस्वी होतात”, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.