नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील गुरुद्वारा रकिबगंज साहिब येथे भेट दिली आणि गुरू तेग बहादूर यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.
गुरू साहेबांची खास कृपा आहे की, आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही श्री गुरू तेग बहादूरजी यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाचा विशेष उत्सव साजरा करणार आहोत. चला, हा पवित्र कार्यक्रम ऐतिहासिक पद्धतीने आणि श्री गुरू तेग बहादूरजी यांचा आदर्श कायम राहील असा साजरा करूया, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या वाहतुकीला नियंत्रित करण्यासाठी कोणताही विशेष पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
शीखांचे नववे गुरु, गुरु तेग बहादूर यांच्या पार्थिवावर रकिबगंज येथील गुरुद्वारामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गुरु तेगबहादूर यांचा काल शहीद दिन होता. समाजासाठीच्या गुरू तेगबहादूर यांच्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाचं स्मरण करत कालही पंतप्रधानांनी त्यांना अभिवादन केले होते.