कारगील विजय दिनानिमित्त पंतप्रधानांसह अनेक बड्या नेत्यांचे शहीद जवानांना अभिवादन

कारगिल युद्धाला आज १८ वर्षे झाली. २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने कारगिलमध्ये भारतीय झेंडा फडकावला. आजचा दिवस भारतीय सैन्याचे सामर्थ्य दर्शविणारा विजय दिवस आहे. २६ जुलै प्रत्येक वर्षी ‘विजय दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो, या दिवशी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बलिदान दिलेल्या आपल्या शूरवीर सैनिकांना अभिवादन करण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर द्वारे कारगिल युद्धामध्ये लढलेल्या जवानांना अभिवादन करताना “आजचा दिवस देशासाठी लढणाऱ्या आणि जनतेचं संरक्षण करणाऱ्या शूरवीर जवानांची आठवण करून देतो, भारतीय लष्कराच्या सामर्थ्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे” असे म्हंटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटर द्वारे भारतीय सैन्याच्या शूर जवानांना अभिवादन केले आहे.

केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील जवानांना अभिवादन करण्यासाठी ट्विट केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी कारगिल विजय दिनानिम्मित्त ट्विटर द्वारे अभिवादन केले आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1022345010010832896

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)