नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संबोधित करत आहेत. आज सकाळी 10 वाजता पंतप्रधान जनतेशी संवाद साधतील. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरुन याविषयी माहिती देण्यात आली आहे.
ट्विटमध्ये म्हणाले कि, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करतील..” असं म्हटलं आहे.
PM @narendramodi will address the nation at 10 AM today.
— PMO India (@PMOIndia) October 22, 2021
लसीकरणाने आता देशात मजबूत सुरक्षा कवच – पंतप्रधान
“21 ऑक्टोबर 2021 हा दिवस इतिहासात नोंदला गेला आहे. भारताने काल लसींचे 100 कोटी डोस देण्याचा टप्पा पार केला ‘देशाकडे गेल्या 100 वर्षांच्या सर्वात मोठ्या जागतिक साथीला
सामोरे जाण्यासाठी लसींच्या 100 कोटी डोसची मजबूत संरक्षक ढाल आहे. ही भारताची, भारतातील प्रत्येक नागरिकाची ही मोठी उपलब्धी आहे. असं मोदी म्हणाले.
वेगाने लसीकरण करण्यासाठी आपण एक यंत्रणा उभारली, कोविन अॅपचं जगभरातून कौतुक 100 कोटी डोस पूर्ण होणं, हे काही सोपी गोष्ट नव्हती पण भारताने हे काम करुन दाखवली.”