नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळपासून रात्री पर्यंत सतत कामात व्यस्त असतात, परंतु निवांत क्षणी ते दिल्लीच्या लोककल्याण मार्गावर म्हणजेच पंतप्रधान निवासस्थानी असलेल्या मोराला अन्न (दाणे) खायला घालायला विसरत नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निसर्ग आणि पक्ष्यावरील प्रेम सोशल माध्यमावरील पोस्टद्वारे समोर आले आहे. त्यांनी आज आपल्या ट्विटवर अकाउंट एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी मोरा सोबत दिसत आहेत. यात मोदी मॉर्निंग वॉक नंतर मोरांना दाणे टाकताना दिसत आहेत.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1306572256349143/
व्हिडिओमध्ये मोदी लॉनमध्ये फेरफटका मारताना दिसत आहेत. मोर कधी पंतप्रधान निवासाच्या आतील बाजूस किंवा कधी लॉनवर दिसत आहे, जेथे पंतप्रधान मोदी मोरास दाणे(अन्न) खाण्यास देत आहेत. तसेच व्हिडिओ शेअर करताना मोदींनी एक कविता देखील शेअर केली आहे. त्या कवितेव्दारे त्यांनी मोर, पहाट, शांतता, आनंद आणि शांततेचे महत्त्व सांगितले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी शेअर केलेली कविता….
भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर,
रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना,
मनमोहक, मोर निराला।
रंग है, पर राग नहीं,
विराग का विश्वास यही,
न चाह, न वाह, न आह,
गूँजे घर-घर आज भी गान,
जिये तो मुरली के साथ
जाये तो मुरलीधर के ताज।
जीवात्मा ही शिवात्मा,
अंतर्मन की अनंत धारा
मन मंदिर में उजियारा सारा,
बिन वाद-विवाद, संवाद
बिन सुर-स्वर, संदेश
मोर चहकता मौन महकता।