PM मोदी -CM ठाकरे भेटीनंतर संजय राऊतांकडून मोदींचे कौतुक; चर्चांना उधाण

मोदींच्या चेहऱ्यामुळेच भाजपाच्या पदरात 'यश'; संजय राऊतांकडून जाहीर कौतुक

नाशिक – २०१४ लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर करून भाजपने प्रचंड बहुमत मिळवले होते. तर तेथून पुढील सर्व निवडणुकांमध्ये भाजप पक्षाकडून प्रचंड बहुमत मिळविण्यासाठी मोदी यांचा चेहरा समोर केला गेला. निवडणुकांच्या या  रणनीतीवरून नाशिक येथे पत्रकारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही असं त्यांनी आपलं मत मांडलं  आहे.

ते पुढे म्हणाले,’भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते नरेंद्र मोदी आहेत असं मी मानतो. गेल्या सात वर्षात मोदींच्या चेहऱ्यामुळेच भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही. कदाचित भाजपला प्रत्येक निवडणुकांमध्ये मोदींचाच चेहरा समोर करत निवडणूक  रणनीती  तयार करण्याशिवाय पर्याय नसावा.अटलबिहारी वाजपेयींचाही फोटो सर्व ठिकाणी वापरला जात होता. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा आणि फोटोही कार्यकर्ते वापरत असतात. आदेश काढला म्हणून चेहरा वापरणं थाबंत नाही. हे शेवटी कार्यकर्त्यांवर अवलंबून असतं.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.