कांथी – पश्चिम बंगालच्या कांथीमध्ये बुधवारी निवडणूक रॅलीदरम्यान एक अनोखे दृष्य पाहायला मिळाले. मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बसले होते, तेव्हा एका भाजप नेत्याने त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोदींनी त्या कार्यकर्त्याला पाया पडण्यापासून रोखले आणि स्वतः त्या कार्यकर्त्याला पाया पडून अभिवादन केले.
पंतप्रधान ज्या नेत्याच्या पाया पडले, ते अनूप चक्रवर्ती कांथीचे भाजपाध्यक्ष आहेत. भाजपने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ.
भाजपा एक ऐसा सुसंस्कृत संगठन है, जहां कार्यकर्ताओं में एक-दूसरे के प्रति समान संस्कार का भाव रहता है।
पश्चिम बंगाल में चुनावी रैली के दौरान मंच पर जब एक भाजपा कार्यकर्ता पैर छूने आया, तो पीएम श्री @narendramodi ने भी पैर छूकर कार्यकर्ता का अभिवादन किया।#BanglarUnnotiteBJPChai pic.twitter.com/QDGSKNqbBb
— BJP (@BJP4India) March 24, 2021
या घटनेचा एक व्हिडिओ भारतीय जनता पक्षाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. भाजपने व्हिडिओ पोस्ट करत लिहीले की, भाजप एक अशी सुसंस्कृत संघटना आहे, जिथे कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांबद्दल समान संस्काराची भावना आहे.