PM Modi On Paris Olympic । पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची भव्य सुरुवात झाली आहे. उद्घाटन समारंभात शटलर पीव्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरथ कमल हे भारताचे ध्वजवाहक होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय संघाचे अभिनंदन केले आणि प्रत्येक खेळाडू हा भारताचा अभिमान असल्याचे सांगितले.
पीव्ही सिंधू आणि शरथ कमल हे 117 सदस्यीय भारतीय तुकडीचे दोन ध्वजवाहक होते. त्यापैकी 78 सदस्य शुक्रवारी पॅरिसमध्ये झालेल्या उद्घाटन समारंभात सहभागी झाले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. ऑलिम्पिकच्या इतिहासातील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती, परंतु आता या आकडेवारीत आणखी सुधारणा करण्याकडे देशाचे लक्ष आहे. पदकतालिकेत दुहेरी अंक गाठणे आणि एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकणे हे भारतीय खेळाडूंचे सर्वात मोठे ध्येय आहे.
प्रत्येक खेळाडूला ‘भारताचा अभिमान’ PM Modi On Paris Olympic ।
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर “प्रत्येक खेळाडूला ‘भारताचा अभिमान’ संबोधले आणि त्यांनी खेळाची खरी भावना अंगीकारावी” अशी अपेक्षा व्यक्त केली.
As the Paris #Olympics commences, my best wishes to the Indian contingent. Every athlete is India’s pride. May they all shine and embody the true spirit of sportsmanship, inspiring us with their exceptional performances. #Paris2024
— Narendra Modi (@narendramodi) July 26, 2024
केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की,”भारतीय तुकडी ऑलिम्पिकमध्ये जागतिक स्तरावर आपली ताकद दाखवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो.”
खेळाडूंकडून देशवासीयांच्या अपेक्षा PM Modi On Paris Olympic ।
पॅरिस ऑलिम्पिकबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बड्या दिग्गजांना पराभूत करण्याची क्षमता असलेल्या भारतीय संघात अनुभव आणि युवा उत्साह यांचा चांगला मिलाप आहे. यावेळी त्यांच्या खेळाडूंकडून देशवासीयांच्या अपेक्षा खूप जास्त आहेत.
पदकतालिकेत दुहेरी अंक गाठणे आणि एकापेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकणे हे भारतीय खेळाडूंचे सर्वात मोठे ध्येय आहे. हे दोन्ही विक्रम देशासाठी ऐतिहासिक ठरतील. 117 सदस्यांच्या टीममध्ये अनेक ‘सूरमा’ आहेत, जे हे स्वप्न पूर्ण करू शकतात. हॉकी, नेमबाजी आणि बॅडमिंटनसह सात खेळांमध्ये चार वर्षांतून एकदा होणाऱ्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडू मैदानात उतरतील.