नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या सावटाखाली देशभरात आज रामनवमी साजरी केली जात आहे. भलेही त्यासाठी नागरिक घराबाहेर पडत नसले तरी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी रामनवमीनिमित्त टि्वट केले आहे. पंतप्रधान मोदींनी टि्वट करुन ‘जय श्रीराम’ म्हटले आहे. तर माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनीही टि्वट केले आहे.
रामनवमीनिमित्त मोदी यांनी टि्वट करुन रामनवमीच्या पावन दिनी समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा, जय श्रीराम, असे टि्वट केले आहे.
रामनवमी के पावन अवसर पर समस्त देशवासियों को हार्दिक शुभकामनाएं। जय श्रीराम!
— Narendra Modi (@narendramodi) April 2, 2020
May the divine grace of Lord Ram help us overcome these tough times. May love and good health be with you all your life.
#RamNavmi #रामनवमी pic.twitter.com/wLCBNbqpcm
— VVS Laxman (@VVSLaxman281) April 2, 2020
माजी क्रिकेटपटू लक्ष्मण यांनीही आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, मी प्रार्थना करतो की रामाच्या कृपमुळे या संकटाच्या काळातून आपण सुखरुप बाहेर निघू. जीवनात तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य आणि प्रेम मिळो.
कोरोना विषाणूमुळे देशभरात सर्व छोटे-मोठे मंदिर बंद आहेत. त्यामुळे राम नवमीनिमित्त नेहमीसारखी प्रसन्नता दिसत नाही. सरकार आणि डॉक्टर कोरोना विषाणूपासून बचावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन ते करत आहेत. अशावेळी त्यांच्या आवाहनास साद देत नागरिकांनाही घराबाहेर न पडता सुरक्षित राहिले पाहिजे.