त्यांच्याकडे ‘परिवार ही पार्टी’, तर आपल्याकडे ‘पार्टी ही परिवार’ : मोदींचा काँग्रेसवर निशाणा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील हिंगोलीमधील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा देखील साधला. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, “आपल्या पक्षामध्ये कोणताही निर्णय एका व्यक्तीला अथवा एका परिवाराला काय हवं आहे याच्यावरून होत नाही. भारतामध्ये जास्तीत जास्त पक्षांमध्ये आपल्याला ‘परिवाराचं पार्टी’ आहे असं चित्र पाहायला मिळत मात्र भाजपमध्ये याउलट ‘पार्टी हाच परिवार’ असल्याचं दिसून येत.”

दरम्यान, काँग्रेसकडून आजच प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा उचलल्याने मोदी यांचा निशाणा सरचिटणीस पदी वर्णी लागलेल्या प्रियांका गांधी यांच्यावरच होता की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/ANI/status/1088037027667296256

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)