PM Modi in Ahmednagar। आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. देशातील ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यातच आता लोकसभेच्या चोथ्या टप्प्याच्या मतदानासाठी येत्या १३ मी रोजी पार पडणार आहे. त्यात अहमदनगर मतदार संघासाठी चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे. याठिकाणी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये PM Modi in Ahmednagar।
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नगरमध्ये येणार आहेत. दुपारी तीन वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर मधील संत निरंकारी भवन मैदानावर सभा होणार आहे.
प्रमुख नेत्यांची उपस्थिती PM Modi in Ahmednagar।
नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अहमदनगरची सभा संपल्यानंतर मोदी यांची बीड येथे सायंकाळी सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हे वाचलं का ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात