नवी दिल्ली – देशात अचानक आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या महामारीत दररोज जवळपास चार हजार भारतीयांचा बळी जात आहे. मोठ्या हिमतीने देश या रोगाचा सामना करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दररोज राज्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. दरम्यान शुक्रवारी नरेंद्र मोदी एका बैठकीत बोलताना करोनामुळे झालेल्या मृत्यूंचा उल्लेख करताना भावूक झाल्याचे पहायला मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील डॉक्टर, पॅरामेडिकल कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी करोनामुळे आपला जीव गमावावा लागणाऱ्यांबद्दल बोलताना मोदींना भावना अनावर झाल्या.
“या व्हायरसने आपल्या अनेक जीवलग व्यक्तींना हिरावून घेतलं आहे. मी त्यांच्याबद्दल नम्र आदर व्यक्त करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करतो,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. हे बोलत असताना नरेंद्र मोदींना भावना अनावर झाल्याचं दिसत होतं.
कोरोना ने हमसे कई अपनों को छीना है। मैं उन सभी लोगों को अपनी श्रद्धांजलि देता हूं, उनके परिजनों के प्रति सांत्वना व्यक्त करता हूं।
कोरोना की सेकेंड वेव में हमारे हेल्थ सिस्टम पर बहुत बड़ा दबाव पैदा हुआ। डॉक्टर्स, हेल्थ वर्कर्स के परिश्रम से हम इस चुनौती का मुकाबला कर रहे हैं। pic.twitter.com/Zuh8BwsGEe
— Narendra Modi (@narendramodi) May 21, 2021
“संसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असून रुग्णांचा रुग्णालयामधील कालावधीदेखील वाढला आहे,” असेही त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना मोदी म्हणाले, लसीकरणामुळे पहिल्या फळीतील योद्ध्यांना संरक्षण मिळाले असून ते लोकांची सेवा करु शकत आहेत. आगामी काळात आपण सर्वांसाठी लसीकरणाची व्याप्ती वाढवणार आहोत. तसेच करोनाच्या लढाईदरम्यान काळ्या बुरशीचे नवे संकट निर्माण झाले असून आपण त्यादृष्टीने पूर्वकाळजी आणि तयारी करणे गरजेचे असल्याचे आहे, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, या कॉन्फरन्सचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर वर शेअर करण्यात आला आहे. पंतप्रधान भावुक झाले यावरून समाजवादी पार्टीचे आय पी सिंग यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. हे नाटक असल्याचे त्यांनी म्हटलेय.
https://twitter.com/IPSinghSp/status/1395706860892688385?s=19