PM Modi-Giorgia Meloni। पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडातील कनानास्किस याठिकाणी पोहोचले आहेत. या परिषदेत त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनीसह अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यावर पंतप्रधान मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीचा फोटो शेअर, “इटली आणि भारत यांच्यात एक मजबूत मैत्री आहे.”असे म्हटले. यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. भारत आणि इटलीमधील मैत्री अधिक मजबूत होईल आणि ती आपल्या लोकांच्या हिताची असेल.”
Fully agree with you, PM Giorgia Meloni. India’s friendship with Italy will continue to get stronger, greatly benefitting our people!@GiorgiaMeloni https://t.co/LaYIIZn8Ry
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2025
मोदींची जगातील अनेक मोठ्या नेत्यांशी चर्चा PM Modi-Giorgia Meloni।
पंतप्रधान मोदींनी परिषदेतून वेळ काढून दक्षिण कोरिया, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या नेत्यांचीही भेट घेतली. त्यांनी पहिल्यांदाच मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम पारडो यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी ग्लोबल साउथच्या प्राधान्यक्रमांवर आणि इतर महत्त्वाच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर त्यांचे विचार मांडले.
पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांचीही भेट घेतली. सोशल मीडियावर या बैठकीची माहिती शेअर करताना त्यांनी लिहिले की, “G7 शिखर परिषदेदरम्यान ऑस्ट्रेलियाचे माझे मित्र पीएम अल्बानीज यांना भेटून आनंद झाला.” याशिवाय मोदींनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांचा एक फोटोही शेअर केला. त्यांनी लिहिले की रामाफोसा यांच्याशी बोलून त्यांना आनंद झाला. परिषदेत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ते जागतिक नेत्यांना भेटतील आणि अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील आणि विशेषतः जागतिक दक्षिण (दक्षिण देश) च्या चिंता आणि गरजा प्रमुखतेने मांडतील. PM Modi-Giorgia Meloni।