पंतप्रधान मोदींनी झाकीर नाईकच्या हस्तांतराची मागणी केली नाही

मलेशियाचे पंतप्रधान महथिर मोहम्मद यांचा दावा

नवी दिल्ली : इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला भारतात परत आणण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परंतु, यासर्वांमध्ये मलेशियातून मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याच्या हस्तांतराची कोणतीही मागणी आपल्याकडे केली नाही, असा दावा मलेशियाचे पंतप्रधान महथिर मोहम्मद यांनी केला आहे.

मलेशियाचे पंतप्रधान महथिर मोहम्मद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच भेट झाली होती. याच भेटीदरम्यान, मोदींनी आपल्याकडे झाकीर नाईकविषयी कोणतीही मागणी केली नसल्याचे मोहम्मद यांनी म्हटले आहे. हे सांगत असताना मोहम्मद यांनी, अनेक देशांना झाकीर नाईक यांना आसरा द्यायचा नव्हता. मी पंतप्रधान मोदींना भेटलो, पण झाकीर नाईक यांना परत पाठवायला त्यांनी काहीही सांगितले नाही. यावरून झाकीर नाईकदेखील भारताला त्रास देऊ शकतो असेच संकेत यातून स्पष्ट होतात असेही त्यांनी म्हटले. मलेशियन पंतप्रधान महाथिर मोहम्मद म्हणाले की झाकीर नाईक या देशाचे नागरिक नाहीत. आधीच्या सरकारने त्यांना येथे राहण्यासाठी कायमचा दर्जा दिला होता. कायमस्वरुपी रहिवाशांना देशाच्या प्रणालीवर किंवा राजकारणावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. त्यांनी त्याचे उल्लंघन केले आहे, म्हणून आता त्यांना काहीही बोलण्याची परवानगी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×