PM Modi at Nimu : चीनची सावध प्रतिक्रिया

नवी दिल्ली : चीनसोबत असणाऱ्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पूर्व लडाखमध्ये सीमेवरील तैनात जवानांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांच्यासमवेत संरक्षण दलप्रमुख बिपीन रावत होते. सकाळी साडे नऊच्या सुमारास पंतप्रधान लेह येथे पोहोले. तेथून लष्कर, हवाई दल आणि इंडो तिबेटीयन पोलिस दलाच्या कर्मचाऱ्यांशी त्यांनी निमू येथे संवाद साधला. 

पंतप्रधान मोदी यांनी निमू येथे जवानांशी संवाद साधल्याच्या पार्श्‍वभूमीवर चीनने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारत आणि चीनमध्ये तणाव कमी करण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. सध्याच्या स्थितीत परिस्थिती चिघळेल अशी कृती कोणीही करत नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजीन म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.