अहमदाबाद – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या 9 मार्चपासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे देखील उपस्थित राहणार आहेत.
या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकत भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र, तिसरा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाने ही आघाडी 2-1 अशी कमी केली. आता अहमदाबादचा चौथा सामना मालिकेचा निर्णय लागण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होणार आहे.
गुजरात क्रिकेट संघटनेने शुक्रवारपासूनच चौथ्या कसोटीसाठी सामान्य नागरिकांसाठी तिकीट विक्री सुरू केली आहे. या कसोटीचा पहिला दिवस वगळता उर्वरित चार दिवसांसाठी बूक माय शो ऍपवरून तिकीट बूक करू शतकात. गुजरात क्रिकेट संघटनेने या कसोटीसाठी 200, 300, 350, 1000 व 2000 रुपयांची तिकिटे उपलब्ध केली आहेत.
ICC World Test Championship : ऑस्ट्रेलिया थाटात अंतिम फेरीत, आता भारतीय संघाला….
चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, श्रीकर भरत, इशान किशन, रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, महंमद शमी, महंमद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनाडकट.