पीएम-किसान योजना म्हणजे सरकारी पैशाने मते विकत घेण्याचाच प्रकार : चिदंबरम यांचा आरोप

नवी दिल्ली – शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांची मदत देण्याचा प्रकार म्हणजे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी पैशाने थेट मतेच विकत घेण्याचा प्रकार आहे असा आरोप माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे. शेतकऱ्यांना रोज 17 रूपये देऊन त्यांच्या समस्या दूर होणार नाहीत असेही त्यांनी म्हटले आहे. इतकी अपुरी मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टाच असल्याची टीकाही चिदंबरम यांनी केली आहे.

मोदी सरकारने या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांना सहा हजार रूपयांची वार्षिक मदत करण्याची योजना जाहीर केली आहे. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जाणार असून पंतप्रधान मोदी यांनी काल उत्तरप्रदेशात काहीं शेतकऱ्यांना दोन हजार रूपयांचे धनादेश प्रदान करून या योजनेची सुरूवात केली आहे. सरकारी तिजोरीवर या योजनेमुळे 75 हजार कोटी रूपयांचा भार पडणार आहे. त्या योजनेवर चिदंबरम यांनी वरील टीका केली आहे.

सरकारी पैशातून मतदारांना लाच देण्याचाच हा एक प्रकार आहे असेही त्यांनी म्हटले आहे. लोकशाहीत या सारखा लाजिरवाणा प्रकार यापुर्वी घडला नव्हता असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. सरकारने जीएसटी करप्रणालीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here