शेतकरी दिनी 9 कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून “गुड न्यूज’; लवकरच…

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता जाहीर करणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. पीएमओच्या म्हणण्यानुसार, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना 18 हजार कोटी रूपयांहून अधिक रक्कम पाठविण्यास परवानगी देतील.

नरेंद्र मोदी या कार्यक्रमादरम्यान 6 वेगवेगळ्या राज्यांतील शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी व्यतिरिक्त सरकारने घेतलेल्या इतर उपायांवरही चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर देखील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पीएमओ कार्यालयाने दिली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कसा घ्याल?

1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते, शेतजमिनीचे कागदपत्र, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे.

2) नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान किसानच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

3) यानंतर नवीन नोंदणी पर्यायावर क्लिक करावे लागेल.

4) नंतर आधार क्रमांक विचारला जाईल. आधार क्रमांक दिल्यानंतर नोंदणी फॉर्म आपल्यासमोर येईल.

5) दिलेल्या माहितीनुसार नोंदणी फॉर्म भरा आणि सबमिट करा. यासह, आपल्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल.

6) तुम्हाला यासंदर्भात कोणतीही समस्या असल्यास 011-24300606 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.