सरकारी भ्रष्टाचार रोखण्याचे पंतप्रधानांची “कॅग’ला सूचना

नवी दिल्ली : सरकारी विभागांमधील फसवणूकी रोखण्यासाठी तांत्रिक साधने विकसित करावीत आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्यात भूमिका निभावावी, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लेखा परीक्षक अर्थात “कॅग’ला सांगितले. ते महालेखा परीक्षक (कॅग) च्या अधिवेशनामध्ये डिजिटल जगात लेखापरीक्षण आणि आश्वासनांचे रूपांतरण याविषयी बोलत होते.

“कॅग’ने व्यावसायिक फसवणूकीचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा शोध घ्यावा. प्रशासन आणि कार्यकुशलता सुधारण्यात ऑडिटर महत्वाची भूमिका बजावू शकतो. “कॅग’ने देशातील कामाच्या प्रक्रियेवर आधारित, वेळेवर आधारित दृष्टीकोन ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारत पाच ट्रिलियन डॉलर्सची आर्थिक शक्ती बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याने यात नियंत्रक आणि महालेखापालांचा महत्त्वाचा वाटा आहे, असेही ते म्हणाले.

2022 पर्यंत सरकारला पुराव्यावर आधारित धोरण निश्‍चिती करायची आहे. “कॅग’ एक थिंक टॅंक बनून मोठ्या डेटा विश्‍लेषणावर लक्ष केंद्रित करण्याची भूमिका बजावू शकते. ही संस्था केवळ आकडेवारी आणि कार्यपद्धतीपुरती मर्यादित नसावी. “कॅग’ सरकारी संस्थांचा आरसा म्हणून काम करते आणि त्यांना त्यांच्या उणीवा दर्शविते, असेही मोदी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.