PM Benjamin Netanyahu । इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या घराला लक्ष्य करून हिजबुल्लाने हा हल्ला केला. यानंतर इस्रायलचे परराष्ट्र मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी एक ट्विट करत इराणवर निशाणा साधला आहे.
परराष्ट्र मंत्री कॅट्झ यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “संयुक्त राष्ट्रातील इराणी दूतावासाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या हत्येच्या प्रयत्नासाठी हिजबुल्लाला जबाबदार धरले आहे. यामागे हिजबुल्लाचा हात असल्याचा इराणचा दावा आहे. इराण ज्या संघटनेला पैसा, प्रशिक्षण, शस्त्रे इत्यादी पुरवत आहे ती अचानक स्वतंत्र संघटना बनते.”
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर हल्ला PM Benjamin Netanyahu ।
इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत त्यांनी सांगितले की, या ड्रोन हल्ल्यामागे इराणच्या एजंट हिजबुल्लाचा उद्देश त्यांना ठार मारण्याचा होता. या ड्रोन हल्ल्याद्वारे आपल्याला तसेच त्यांच्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावाही नेतान्याहू यांनी केला.
नेतान्याहू पुढे म्हणाले, ‘इराणच्या एजंटांनी हे करून मोठी चूक केली आहे. अशा परिस्थितीत हा हल्ला मला युद्ध सुरू ठेवण्यापासून रोखू शकत नाही. जो कोणी इस्रायलला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल त्याला मोठी किंमत मोजावी लागेल, असे बेंजामिन म्हणाले की, आम्ही गाझामधून आमच्या ओलीसांना परत आणू आणि दहशतवाद्यांचा खात्मा करू. इस्रायल हे युद्ध जिंकेपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू.
हायफाच्या सीझेरिया भागात ड्रोन हल्ला PM Benjamin Netanyahu ।
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घरावर ड्रोन हल्ला झाला तेव्हा ते त्यांच्या घरी उपस्थित नव्हते. शनिवारी (19 ऑक्टोबर) नेतन्याहू यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या हैफाच्या सीझेरिया भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला. ड्रोनने ज्या जागेला लक्ष्य केले ते नेतन्याहू यांच्या घराचा भाग आहे.