पिस्तुलाचा धाक दाखवून सराफ दुकानात लूट

भरदिवसा थरार, व्यावसायिकाकडून तीव्र प्रतिकार

पिस्तुलाच्या धाकामुळे चोरटे निसटले
सचिन ओसवाल यांच्यासोबत झालेल्या झटापटीमध्ये ट्रे मधील शिल्लक दागिने घेऊन चोरट्यांनी पळ काढला. सचिन यांनी आरडा-ओरडा करत त्यांचा पाठलाग केला. रस्त्यावरील काही लोक पकडण्यासाठी पुढे सरसावले, परंतु चोरट्यांच्या मात्र, हातात पिस्तूल असल्याने त्यांच्या जवळ जाऊन पकडण्याचे धाडस कोणाला करता आले नाही. पिस्तुलाचा धाक दाखवून या चोरट्यांनी जमावातूनही पळ काढला.

पिंपरी – खरेदी करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून भर दिवसा सराफा दुकानात दागिने लुटले केली. ही धक्कादायक घटना शुक्रवार (दि.24) मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास निगडी येथील सचिन ज्वेलर्स या दुकानात घडली. यावेळी दुकानदारांने प्रसंगावधान राखत चोरट्यांना तीव्र प्रतिकार केला, मात्र काही दागिने पळविण्यात चोरटे यशस्वी ठरले.

याबाबत निगडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निगडी येथे सचिन ओसवाल यांचे सचिन ज्वेलर्स हे दागिन्यांचे दुकान आहे. दुपारी दोन वाजताच्या सुमारास आरोपी ज्वेलरी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आले. त्यांनी सचिन यांना वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दाखवण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी सांगितलेले दागिने सचिन एका ट्रेमध्ये घेऊन आल्यानंतर दोघांनी आपल्या जवळील पिस्तूल काढून पिस्तुलाचा धाक दाखवत दागिन्यांचा ट्रे पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी, सचिन यांनी प्रसंगावधान राखत दुकानातील लोखंडी रॉड घेऊन चोरट्यांना मारला.

यावेळी, झालेल्या झटापटीत ट्रे मधील काही दागिने खाली पडले. सचिन यांच्याकडून तीव्र प्रतिकार होत असल्याने हातात येतील ते दागिने घेऊन त्यांनी लगेच पळ काढला. सचिन यांनी पाठलाग केला मात्र चोरट्यांच्या हातात पिस्तूल असल्याने इतर कोणी त्यांना पकडण्याचे धाडस केले नाही. निगडी येथे रहदारीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत निगडी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणाचा अधिक तपास निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार हे करीत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)