पुणे : आधार कार्ड अपडेट करणे आता सोपे झाले आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गूगल प्ले स्टोअर वर जा आणि एम. आधार हे अॅप डाउनलोड करा.
ज्या फोनमध्ये आपण आधारकार्डला नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरत आहात त्याच फोनमध्ये हे अॅप डाउनलोड करा. कारण एसएमएसद्वारे आपल्याला त्याच नंबरवर ओटीपी येईल.
यानंतर आपलं एम. आधार अॅप अॅक्टिव्ह होईल. त्यानंतर आपल्याला एक पासवर्ड तयार करायचा आहे.यानंतर आपला आधार नंबर प्रविष्ट करा. नंबर प्रविष्ट करताच आपल्याला आपले आधार कार्ड दिसेल. येथे आपल्याला कार्डाच्या खाली टीओटीपी दिसेल. त्यानंतर ओटीपीवर टॅप केल्यानंतर तुम्हाला 8 अंकी पासवर्ड दिसेल. हा पासवर्ड केवळ 30 सेकंदांसाठी वैध असेल. वेळ संपल्यानंतर नवीन टीटीपी उत्त्पन्न होईल.
आधार कार्डची डिजिटल कॉपी अशी डाउनलोड करा
आता जेव्हा आपल्याला वेबसाइटवरून आपले आधार कार्ड डाउनलोड करायचे असेल किंवा कोणतीही माहिती अद्यतनित करायची असेल तर, यावेळी, स्मार्टफोनवर दिसणारा टीओटीपी वापरता येईल. त्यानंतर आधार तुम्ही डाउनलोड करू शकतात.