#CWC2019 – ‘आयपीएलप्रमाणे प्लेऑफ सामना पाहिजे’ – विराट कोहली

लंडन – भारतीय संघाने विश्‍वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेत भरात असलेल्या भारतीय संघाला एका खराब खेळीची किंमत स्पर्धेतून बाहेर होत चुकवावी लागली. याच पार्श्‍वभूमीवर बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने विश्‍वचषक स्पर्धेत आयपीएलप्रमाणे प्लेऑफ सामना आयसीसीने घ्यावा असा सल्ला दिला आहे.

आगामी काळात विश्‍वचषकामध्येही प्लेऑफचा सामना खेळविण्यात यावा का? याबाबत कोहलीला विचारणा करण्यात आली. “भविष्यात कदाचित हा निर्णय घेतला जाऊ शकतो. स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करणे जर गरजेचे असेल तर स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन प्लेऑफ पद्धतीबाबतही विचार करता येऊ शकतो’, असे कोहली म्हणाला.

Leave A Reply

Your email address will not be published.