भोपाल मधील घटना ;फास बसून मुलाचा दुर्दैवी मृत्यू
भोपाळ : सध्या करोना महासंकटाच्या कालावधीमध्ये शाळा महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत विशेषतः शालेय विद्यार्थी घरातच खेळत असतात किंवा अभ्यास करत असतात. पण घरातीलच असे खेळणे एका दहा वर्षे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आणि त्याला जीव गमवावा लागला भोपाळमधील आयोध्या नगर येथील ही दुर्दैवी घटना आहे.
ऋतिक शर्मा असे या दहा वर्षे विद्यार्थ्याचे नाव आहे 29 ऑगस्ट रोजी तो आयोध्या नगर येथील आपल्या घरांमध्ये आई आणि बहिणीसोबत गप्पा मारत होता त्याच्यावेळी ती आपल्या छोट्या पियानोचंही आनंद घेत होता या दोन गोष्टी करत असताना ती आधींमधून खोलीतील पडद्याशी खेळत होता.
अचानक त्या पडद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती बसला आणि तो ओरडू लागला आणि काही क्षणातच बेशुद्ध पडला घरातल्या लोकांच्या लक्षात घटनेचे गांभीर्य लक्षात आल्याने घरातल्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले तब्बल दहा दिवस त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती नंतर गेल्या आठवड्यात त्याचा मृत्यू झाला