नवी दिल्ली – करोना योद्ध्यांनंतर फक्त ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंना लस देण्यात येईल, असे केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी सांगितले.
करोना योद्ध्यांना लस देऊन झाल्यावर जेव्हा इतरांचे लसीकरण सुरू होईल, तेव्हा ऑलिम्पिकला पात्र ठरलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात येईल. काही दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रालयाने खेळाडूंना लस देण्याविषयी आरोग्य खात्याला विनंती केली होती.