#CWC19 : खेळाडूंनी देशाची प्रतिष्ठा राखावी- आफ्रिदी

लंडन – पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताकडून सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान संघ हा कडवट टीकेचा धनी झाला आहे. उर्वरित प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना आज दक्षिण आफ्रिकेशी लढत द्यावी लागणार आहे. त्यापूर्वी माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने संघाने उर्वरित सामने जिंकावेत व देशाची प्रतिष्ठा राखावी असा सल्ला दिला आहे.

आफ्रिदी म्हणाला, “भारताकडून पराभव पत्करण्यासाठी आमचे चाहते कधीही तयार नसतात. येथे ज्याप्रकारे त्यांनी हाराकिरी केली ते पाहता त्यांच्याकडे जागतिक स्तरावर खेळण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कौशल्याचा अभावच आहे. चाहत्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया नेहमीच प्रतिक्षिप्त असते. या पराभवापासून बोध घेत देशाची लाज राखण्यासाठी त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्‍यक आहे”, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here