प्लेअर्स कप टेबल टेनिस स्पर्धा: ईशा जोशी, सनत बोकील यांना अग्रमानांकन

पुणे: ईशा जोशी व सनत बोकील या अव्वल खेळाडूंना प्लेअर्स कप जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील महिला व पुरुष एकेरीसह यूथ मुली व मुलांच्याही गटांत अग्रमानांकन देण्यात आले आहे. माजी खेळाडूंनी आयोजित केलेली ही स्पर्धा जिल्हा टेबल टेनिस संघटना आणि डेक्‍कन जिमखाना यांच्या सहकार्याने 27 जुलै ते एक ऑगस्ट या कालावधीत डेक्‍कन जिमखाना येथे पार पडणार असल्याची माहिती संयोजन सचिव आश्‍लेषा बोडस यांनी दिली.

पुरुष, महिला, यूथ मुले व मुली (21 वर्षांखालील), ज्युनियर मुले व मुली (18 वर्षांखालील), सबज्युनियर (15 वर्षांखालील) मुले व मुली, कॅडेट (12 वर्षांखालील) मुले व मुली, मिडजेट (10 वर्षांखालील) मुले व मुली आणि प्रौढ (39 वर्षांवरील) अशा 13 गटांमधील एकेरी, तसेच पुरुष, प्रौढ व मिश्र दुहेरी गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आतापर्यंत 563 खेळाडूंनी आपला सहभाग निश्‍चित केला असून विजेत्यांना 64 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. ज्युनियर गटांत स्वप्नाली नरळे व आयुष गलपल्लीला, सबज्युनियर गटांत अनीहा डिसूझा व अर्चन आपटेला, कॅडेट गटांत देवयानी कुलकर्णी व वेदांग जोशीला, तर मिडजेट गटांत नभा किरकोळे व स्वरूप भडाळकर यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे. प्रौढ एकेरीत दीपेश अभ्यंकर यांना अग्रमानांकन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)