बंदीला झुगारून सर्रास प्लॅस्टिक विक्री सुरू

प्लॅस्टिकच्या वापराबाबत “आपलं सरकार’ पोर्टलकडे तक्रार दाखल

पिंपरी – प्लॅस्टिक बंदीला झुगारून सध्या शहरात सर्रास प्लॅस्टिकची विक्री आणि वापर सुरू आहे. प्लास्टिक बंदी करण्यात आल्यानंतरही त्याची राजरोसपणे विक्री सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आता याबाबत “आपलं सरकार’ पोर्टलवरच एकाने थेट तक्रार केली आहे. त्याची दखल घेऊन महापालिका आरोग्य विभागाने प्लॅस्टिक वापरणाऱ्या टेलरला पाच हजार रूपयांचा दंड केला आहे.

देशभरात 2 ऑक्‍टोंबर 2019 पासून प्लास्टिक बंदी लागू झाली. याबाबत सर्व राज्य सकरार आणि केंद्र शासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक 11 मधील आरोग्य निरीक्षक उमेश कांबळे यांना सन्मान टेलर हे बंदी असलेले प्लॅस्टिक वापरत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. “आपलं सरकार’ पोर्टल हेल्पलाईनकडून ही तक्रार मिळाली. त्याला अनुसरून संबंधित टेलरकडून बुधवारी (दि. 29) पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.