महापालिकेच्या आरोग्य विभागाची कारवाई
गोदामातून तीन टन प्लॅस्टिक करण्यात आले जप्त
नगर (प्रतिनिधी) – शहरातील बालिकाश्रम रस्त्यावरील पंचशीलनगर येथील बोरुडे मळा परिसरात एका घरातच बनविलेल्या प्लॅस्टिकचे गोदामावर महापालिलेच्या आरोग्य विभागाने छापा टाकून तीन टन प्लॅस्टिक जप्त केले आहे. संबंधितास 5 हजारांचा दंड मनपाने ठोठावला आहे.
पंचशीलनगर येथील बोरुडे मळा येथे मनोज चमपालाल कासलीवाल यांच्या राहत्या घरातच अनाधिकृत प्लॅस्टिकचे असल्याचे खात्रीशीर माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने कासलीवाल यांच्या घरी छापा टाकला असता तीन टन अनाधिकृत प्लॅस्टिक आढळून आले. ही कारवाई परीक्षित बिडकर, तुकाराम भांगरे, बाळासाहेब विधाते, अविनाश हंस, सुरेश वाघ, राजेंद्र सामल, तसेच सर्व मुकादम व केअर टेकर सहभागी होते.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेची धुरा हाती घेतातच शहरात बंदी असतांनाही खुले आम प्लॅस्टिक विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मनपाकडून पथक तयार करून कठोर अंमलबजावणीला सुरूवात झाली असून, लाखो रुपयांचे प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून अनेकांना दंड ठोठविण्यात आला आहे. वारंवार याबाबत कारवाया केल्या जात आहेत.