आजपासून देशात प्लॅस्टिक बंदी

नवी दिल्ली – देशात आजपासून प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीपूर्वी प्लॅस्टिक बॅग, कटलरी आणि थर्माकॉलपासून तयार होणारी कटलरी बंद करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत एकदा वापरण्यात येणारे प्लॅस्टिक पूर्णपणे बंद करण्यात येईल असे म्हटले होते.

सध्या एकदा वापरात येणाऱ्या प्लास्टिकमध्ये कोणत्या वस्तू येतात याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्रालय लवकरच एकदा वापरात येणाऱ्या प्लॅस्टिकची व्याख्य जारी करणार आहे. सध्या 24 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सध्या प्लॅस्टिकच्या बॅग्स, प्लॅस्टिकची कटलरी, कप, चमचे, ताट याव्यतिरिक्त थर्माकॉलची ताट, खोटी फुल, बॅनर, झेंडे, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या स्टेशनरी वस्तू आदिंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, टिव्ही, रेडिओद्वारे एकदा वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, यासाठी राज्यांनी जनजागृती करावी, असेही सांगण्यात आले आहे. तसंच पर्यावरण स्थळ, धार्मिळ स्थळ, समुद्र किनारे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रामुख्याने यावर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)