सरकारी मेडिकल कॉलेजमधून प्लाझ्मा थेरपी प्रयोग

राजर्षि शाहू मेडिकल कॉलजेचाही प्रस्ताव

पुणे – करोना बाधितांवर उपचार करण्यासाठी सध्या प्लाझ्मा थेरपी उपचार प्रत्यक्षात येण्यासाठी पाऊल उचलण्यात आली असून त्यामध्ये यश येत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. यासाठी आयसीएमआरने पुढाकार घेतला असून सरकारी मेडिकल कॉलेजमधून हा प्रयोग साकारला जात आहे.

बी.जे. मेडिकल कॉलेजच्या ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी मिळविण्यात येत आहे. ससून रुग्णालयास एफडीएसह “डीसीजीआय’ने नुकतीच परवानगी दिली असून त्या परवानगीनंतर आता “आयसीएमआर’च्या परवानगीची रुग्णालय प्रशासनाला प्रतीक्षा आहे.

ससून पाठोपाठ कोल्हापूरच्या राजर्षि शाहू मेडिकल कॉलेजने सुद्धा एफडीएकडे “प्लाझ्मा फोरेसिस’साठीची परवानगीचा प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीनंतर तसेच रक्तपेढीतील जागेची पाहणी केल्यानंतर एफडीएने सायंकाळी सात वाजता कोल्हापूरच्या मेडिकल कॉलेजला “प्लाझ्मा फेरेसिस’ची परवानगी दिली आहे.

आयसीएमआरची प्रतीक्षा…
कोल्हापूरच्या राजर्षी शाहू मेडिकल कॉलेजमध्ये करोना बाधितांसाठी लागणाऱ्या प्लाझ्माचे घटक वेगळे करण्यासाठी (प्लाझ्मा फेरेसिस) परवानगी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पुणे विभागासह केंद्रीय औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) दिली. त्यामुळे आता “प्लाझ्मा फोरेसिस’ नंतर प्लाझ्मा थेरपीसाठी आता इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चची (आयसीएमआर) प्रतीक्षा करावी लागणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.