शिराळा : बालाजीनगर (सांगली) मध्ये नक्षत्रवन ही संकल्पना राबवून वृक्षारोपण करण्यात आले. सध्या वृक्षारोपण करण्याची धामधूम सर्वत्र सुरू आहे परंतु वेगळी कल्पना राबवून बालाजी नगर सोसायटीने आपले वेगळेपण या वेळी जपले आहे.
यासाठी २७ नक्षत्रानुसार झाडांची निवड करण्यात आली व त्या नुसार त्या नक्षत्र असलेल्या २७ जोडप्याकडून विधिवत पूजा करून सदर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक नक्षत्राचे झाड ओळखून ते या सध्याच्या परिस्थितीत गोळा करण्याचे काम कठीणच परंतु सौ ङाँ. पद्मजा चौगुले मॅडम यांनी या बाबतीत विशेष परिश्रम घेऊन सर्व वृक्ष गोळा केले.
अगदी काही झाडे तर दापोलीहून आणावी लागली त्यानुसार प्रत्येक जोडप्याची निवड करून त्यांना योग्य त्या सूचना देण्याचे काम आणि नियोजन सौ चित्रा पंङियन, श्री पुंडलिक गङदे ( तात्या), श्री बाळासाहेब कोळेकर, श्री अशोक चौगुले, श्री शंकर पाटील, श्री रावसाहेब यमगर सर, श्री महावीर पाटील श्री पटाईत, श्री सप्तसागर सर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. पुजा श्री शंकर पाटील व सौ अलका पाटील याचे हस्ते करण्यात आली. प्रत्येक जोडप्या समोर त्या त्या नक्षत्राचे झाड ठेवुन त्याची गुरुजीमार्फत योग्य ती विधिवत पूजा करण्यात आली व त्या नंतर क्रमाने झाडांचे रोपण करण्यात आले. यासाठी मुद्दाम श्रावणी सोमवारची निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे वेळी वरुण राजाने हजेरी लावून सदर कार्यक्रमास सदिच्छा व आशीर्वाद दिले.
सर्व सदस्यांनी लावलेली झाडे जगण्याची जबाबदारी घेतली आहे.आजच्या कार्यक्रमास ङाॅ नितिन नायक, श्री सुगम शहा, श्री यशवंत पाटील, श्री जयकुमार खोत, प्रकाश काटकर, दिनकर शिंदे, श्री सुभाष कुलकर्णी, ढोले काका, किशोर हसबनीस, सौ. प्रज्ञा हसबनीस, अनिरुद्ध केळकर, ङाॅ चितळे, ए सी पाटील सर उपस्थित होते. शेवटी श्री बाळासाहेब कोळेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.