आधी वृक्षारोपण, मग लग्न!

हिवरे कुंभार येथे स्वतःच्या लग्नासाठी निघालेल्या तरुणाचा आदर्श

शिक्रापूर – हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आज वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्याचे आयोजन केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काढून वृक्षारोपणाचा संदेश दिला. यावेळी स्वतःच्या लग्नासाठी निघालेल्या नवरदेवाने देखील वृक्षारोपण करत वृक्ष संवर्धनाची शपथ घेतली.

गणेश साहेबराव मांदळे असे या अदर्श तरुणाचे नाव आहे. हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने आज सध्या पंढरपूरला दिंडीचे प्रस्थान झाल्यामुळे शाळेमध्ये दिंडी काढून या दिंडीच्या अध्यात्मातून वृक्षारोपण करण्याची प्रेरणा दिली आहे. यावेळी गावकऱ्यांनी हातात टाळ व पखवाज घेऊन संपूर्ण गावातून व विठ्ठल मंदिराचे दर्शन तसेच गोल रिंगण करून यामध्ये फुगडी व टाळ मृदंगाचा नाद धरून या वृक्ष दिंडीला खऱ्या दिंडीचे स्वरूप आणण्यात आले. अशा प्रकारच्या अनेक उपक्रमांचे आयोजन करत अनेक उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे देखील शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी नवरदेव गणेश मांदळे याने वृक्ष संवर्धनाची शपथ घेत वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.