मल्हारपेठ – उरुल, ता. पाटण येथे जगदंबा हायस्कूल परिसरात 33 कोटी वृक्ष लागवड अंतर्गत उद्दिष्टपूर्तीचा वृक्षारोपण शुभारंभ उरुल येथे आ. शंभूराज देसाई यांचे हस्ते करण्यात आला.
उरुल, ता. पाटण येथे वनविभाग पाटण, परिमंडल मल्हारपेठ व उरुल हायस्कूलच्या राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने 33 कोटी वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, वनाधिकारी विलास काळे, रामदास घावटे, पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, सरपंच वैशाली मोकाशी, सरपंच आण्णासो देसाई.
सरपंच मंगल सुर्वे, मुख्याध्यापक बी. एम. शेवाळे, निलेश फडतरे, अनिल निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. या उद्दिष्टपूर्ती वृक्षलागवड अंतर्गत उरुल, ठोमसे, बोडकेवाडी, येराडवाडी, चाफळ, माजगाव, डेरवण, कोरिवळे, बहुले, टेळेवाडी, नवसरवाडी येथील जवळपास 85 हेक्टर क्षेत्रात 65 हजार विविध जातीच्या झाडांची लागण केली जाणार आहे.