याक्‍स मॉलतर्फे वृक्षारोपण

वडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील वधु-वरांचे तसेच लग्न बस्त्याचे एकमेव भव्य वस्त्र दालन असलेल्या कामशेत येथील याक्‍स मॉलच्या वतीने मंगळवारी (दि. 16) फळ व वनौषधी वृक्षांच्या रोपांचे रोपण करण्यात आले.

महाराष्ट्र शासन वन विभागाच्या वतीने सुरू असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड चळवळीत याक्‍स मॉलच्या वतीने 35 फळ व वनौषधी वृक्षांच्या रोपांचे रोपण केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करून वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करण्याची शपथ घेतली. याक्‍स मॉलचे मालक राजेश मांढरे म्हणाले, विनामोबदला ऑक्‍सिजन देणारेच वृक्ष आपले मित्र आहेत. भावी पिढीला सशक्त व तंदुरुस्त ठेवण्यासाठी वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिंदे, अमोल शिंदे, योहान रोकडे, भाग्यश्री क्षीरसागर, अर्चना कटके, सुनीता यादव, स्वाती कुंभार, दीपाली चोपडे, राजश्री भालेराव, शुभम गरुड, माऊली गायकवाड, अशोक काळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.