रेमीडिसेवर इंजेक्शन वर नियोजन समितीचा वॉच

बारामती मनमानी कारभाराला चाप ; रेमीडीसेवर इंजेक्शनवर नियोजन समितीची नेमणूक

बारामती  – शहर व तालुक्यात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. प्लाझमा रक्त त तसेच रेमेडीसिवर इंजेक्शनची कमतरता निर्माण झाली आहे. रुग्णांना वेळेत रेमेडीसिवर इंजेक्शन मिळावे यासाठी नियोजनसाठी समिती नेमण्यात यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यानुसार समिती गठीत करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामती येथे कोरोना संदर्भात आढावा घेतला.त्यांनी महिला रुग्णालयाची पाहणी केली. तसेच तेथील सर्व सुविधांची माहिती घेतली. त्याचबरोबर ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत, त्या ठिकाणची देखील आढावा घेतला आहे अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी दिली.

डॉ. आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले, पुणे जिल्ह्यासाठी कोरोनाच्या लसीकरणाच्या 50 हजार लस मिळाल्या असून, त्यापैकी बारामतीच्या वाट्याला साडेचार हजार आलेली आहे. रेमीडीसीव्हर इंजेक्शनची कमतरता आहे. ती संपूर्ण राज्यात आहे. एकट्या बारामतीसाठी सध्या रेमीडीसीव्हरच्या साडेचारशे इंजेक्शनची आवश्यकता आहे. राज्यात रेमीडीसीवरचे उत्पादन 4 कंपन्या करतात. राज्याला 50 हजार रेमेडीसीवर इंजेक्शन मिळतात. त्यातील साडेसात हजार इंजेक्शन्स पुणे जिल्ह्यात मिळतात. बारामती मध्ये तुटवडा भासत आहे, त्याच्यासाठी नियोजन करण्याकरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समिती नेमली आहे.

 

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे हे नियोजन समितीचे अध्यक्ष असतील. समितीमध्ये सिल्वर जुबली शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सदानंद काळे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे मेडिकल कॉलेजचे प्रतिनिधी डॉक्टर मस्तूद व एफडीए चे डॉक्टर नांगरे यांचा समावेश आहे. यामध्ये बारामतीमधील पाच ते सात मुख्य वितरकांना स्टॉकची नोंद घेतली जाईल. मुख्य वितरकांकडून 27 सब वितरकांना रुग्णांच्या संख्येप्रमाणे रेडमीसीवर इंजेक्शन दिले जाईल. रुग्णांना रेडमी सेवर इंजेक्शन हवे असल्यास संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी एक नमुना फॉर्म भरून देणे गरजेचे आहे. त्यामध्ये रुग्णाचे नाव, स्टोअर व कोणत्या कारणाने रेमडीसेवर द्यावयाचे आहे ते नमूद करावे. डॉक्‍टरांनी केलेला मेल पाहून समितीमधील डॉक्टर त्यावर त्यावर त्वरित निर्णय देतील. व आवश्यकता असेल तेथे मान्यता देतील.

मान्यता दिलेल्या रुग्णास देण्याचे इंजेक्शन दवाखाना स्टोअर स्टॉक मधून खर्ची घातले जातील. ज्या ठिकाणी इंजेक्शन ज्यादा अगर कमी आहे त्याबाबत वापराचे नियोजन समिती डॉक्टर करतील. अत्यंत इमर्जन्सी अवस्थेत वेळी-अवेळी रात्री डॉक्टरांना रुग्णास इंजेक्शन द्यावे लागले तर त्यांनी द्यावे व कार्योत्तर मंजूर करावे असे देखील नमूद करण्यात आले आहे. अशी माहिती ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.