पॅरिस – फ्रान्समध्ये दोन विमानांची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. एका प्रवासी विमानाची मायक्रोलाईट विमानासोबत टक्कर झाल्याने हा अपघात झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी पश्चिम फ्रान्समध्ये घडली.
टक्कर झाल्यानंतर मायक्रोलाइट विमान एका घराजवळ पडले. तर, प्रवासी विमान लोकवस्तीपासून दूर अंतरावर पडले असल्याची माहिती समोर आली आहे.
मायक्रोलाइट विमानात दोन जण होते. अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे.
घटनेनंतर अग्निशमन दलाचे 50 जवान घटनास्थळी दाखल झाले होते. काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आले.
या अपघातात मृत्यू पावलेल्यांची अद्याप ओळख पटली नसून अपघाताची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.
DA40 हे प्रवासी विमान पोयटायर्स शहरातून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळाने
अपघातग्रस्त झाले.