पालिकेच्या स्वच्छता मोहिमेने बसस्थानक झाले चकाचक

कराड  – कराड नगरपालिकेच्या वतीने येथील बसस्थानक परिसरात नुकतीच महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमुळे कराड आगाराचे नवीन बसस्थानक चमकू लागल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

गेले अनेक दिवस प्रलंबित पडलेल्या बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होऊन जानेवारी 2019 पासून अद्ययावत सुविधांनीयुक्‍त बसस्थानक प्रवाशांसाठी सेवेसाठी खुले झाले. मात्र येथे येणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांची सतत गर्दी असल्याने बसस्थानकावर सतत कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेंअंतर्गत बसस्थानक परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. यामध्ये पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, स्वच्छ सर्वेक्षण टीमचे कर्मचारी यांच्यासह आगारप्रमुख व आगारातील वाहतूक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.