लोकसभेच्या 48 जागा युतीच जिंकणार – पियुष गोयल यांचा विश्वास 

कॉंग्रेस-पाकिस्तानची मिलिभगत

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यास पाठिंबा दिल्याने कॉंग्रेसने भाजपला टीकेचे लक्ष्य केले आहे. याला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानला सर्वाधिक भीती वाटते ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. त्यामुळे इम्रान खान यांचे वक्तव्य म्हणजे कॉंग्रेस आणि पाकिस्तानची ही मिलिभगत असल्याचा पलटवार केला आहे. मोदी यांनी पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत बालाकोटमध्ये पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना उत्तर दिले. मात्र कॉंग्रेसकडून जवानांच्या शौर्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. ज्यावेळी मुंबईवर 26/11 हल्ला झाला. त्यावेळी गप्प बसणाऱ्या कॉंग्रेसने तेव्हाच का नाही पाकिस्तानवर हल्ला केला, असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे कॉंग्रेस आणि पाकिस्तानमध्ये मिलिभगत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे ते म्हणाले. 
 
युुनायटेड फॉस्फरसबाबतचे आरोप बिनबुडाचे

युनायटेड फॉस्फरस कंपनीबाबत कॉंग्रेसकडून होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. युनायटेड फॉस्फरस कंपनीत आपले भाऊ प्रदीप गोयल हे स्वतंत्र संचालक आहे. अशा संचालकाचे अधिकार नेमके काय असतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे कॉंग्रेसकडून करण्यात आलेला आरोपात तथ्य नसल्याचे पियुष गोयल म्हणाले. याविषयी अधिक माहिती देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कॉंग्रेस ज्या विषयावर आरोप करीत आहे तो विषय 10 वर्षांपूर्वीचा आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडमधील आवश्‍यक ती जमीन न मिळाल्याने युनायटेड फॉस्फरससोबत होणार असलेला करारच झाला नाही. त्यामुळे कुणाला पैसे देण्याचा किंवा घेण्याचा प्रश्नच आला नसल्याचे स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी केले. 


मुुंबई –
लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात होणाऱ्या 48 मतदारसंघात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह सर्व विरोधकांचा सुफडा साफ होऊन या सर्व जागा शिवसेना-भाजपच जिंकणार असल्याचा विश्वास केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्चाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भाजपाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रिय मंत्री पियुष गोयल बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित होते. गोयल यांनी केंद्र सरकारच्या पाच वर्षांतील कामगिरीची जंत्री मांडली. तसेच या देशात पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची गुुंतवणूक करणार असून यामधून रस्ते, रेल्वे, विमान वाहतुक, वीज आदी क्षेत्रासाठी खर्च करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.