पीयूष चावलाच्या वडिलांचे करोनामुळे निधन

मुंबई  – टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य आणि मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू पीयूष चावलावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पीयूषचे वडील प्रमोद कुमार चावला यांचे आज (10 मे) करोनामुळे निधन झाले आहे. स्वत: पीयूषने इंस्टाग्रामद्वारे माहिती दिली आहे.

तसेच मुंबई इंडियन्सनेदेखील ट्‌विट करून पीयूषच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्‍त केला आहे. प्रमोद कुमार चावला यांना काही दिवसांपूर्वी करोनाची बाधा झाली होती. गेले काही दिवस त्यांचा करोनाविरोधी लढा सुरू होता. मात्र, त्यांना करोनावर मात करण्यात अपयश आलं. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

पीयूष चावला याचे वडील प्रमोद कुमार चावला यांचं करोनाने निधन झालंय. आम्ही या कठीण प्रसंगी पीयूष आणि त्याच्या कुटुंबासोबत आहोत, अशा भावना मुंबई इंडियन्सने ट्‌विट करून व्यकऱ्त केल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.