लोहगाव  – वाघोली रस्त्यावरील खड्डे बुजवले

माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, सागर गोरे यांचे सहकार्य

वाघोली – वाघोली लोहगाव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत होता याबाबत पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांनी प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला होता.

वाघोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र सातव पाटील, सागर गोरे यांनी नागरिकांची समस्या लक्षात घेऊन तातडीने खड्डे बुजवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

लोहगाव वाघोली रस्ता हा वाघोली व लोहगाव ला जोडणारा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर अनेक सोसायट्या लघुउद्योग, शाळा महाविद्यालय आहेत. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.

हा रस्ता कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येत असून सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.

लोहगाव वाघोली रस्त्यावर खड्ड्यांमुळे नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत होते ही सामाजिक जाणीव लक्षात ठेवून माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, सामाजिक कार्यकर्ते सागर गोरे यांनी स्वखर्चाने मुरूम टाकून रस्त्यावरील खड्डे बुजवले आहेत. मात्र तरीदेखील रस्त्याचा प्रश्न सुटला नसल्याने कायमस्वरूपी रस्त्याचे डांबरीकरण करून  रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.