ऐन दुष्काळात पाईपालाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

पुणे : एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असतानाच पुण्यातील विमानगरमधील दत्त मंदिर चौकात पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. आज सकाळची ही घटना आहे. पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर कारंजे उडत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

पुण्यामध्ये आधीच पाणी संकट आहे. त्यातच आज शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आला आहे. असे असताना पाईपलाईन फुटून पाणी वाया जाणं ही गंभीर बाब आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.